Home राजधानी मुंबई कृषी वगळता सर्व 13 विद्यापीठांच्या परीक्षा आॅनलाईन होणार, उदय सामंत यांची माहिती

कृषी वगळता सर्व 13 विद्यापीठांच्या परीक्षा आॅनलाईन होणार, उदय सामंत यांची माहिती

42

मुंबई : राज्यातली कृषी विद्यापीठे वगळता सर्व 13 विद्यापिठांच्या परीक्षा आॅनलाईन होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत [ minister uday samant ] यांनी आज दिली.

परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सर्व विद्यापिठांच्या कुलगुरूंबरोबर चर्चा केल्यानंतर 2021-2022 शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचे याबाबत ठरवले जाईल. 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थांचे लसीकरण करण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर प्राध्यापकांच्या नियुक्ती तसेच कृषी विद्यापीठांच्या परीक्षांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.