Home राजधानी मुंबई विरार रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

विरार रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

23

मुंबई : पालघर जिल्ह्यातल्या विरार पश्चिमेला असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे तीन सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या आगीत १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी दुर्घटनेबद्दल [ VIRAAR FIRE ] दु:ख व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, हर्षवर्धन यांनी देखील दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १४ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून इतर रुग्णांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीची घोषणा केली. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार महापालिकेतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करतानाच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here