Home राष्ट्रीय न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

38

दिल्ली : न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी शनिवारी भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते रमण यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रमण यांचा जन्म 27 आॅगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पुण्णावरम नावाच्या गावात झाला. 1983 साली त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. जून 2000 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर मार्च 2013 पासून ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहू लागले. त्याच वर्षी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नेमणूक झाली तर 2014 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली.