Home राष्ट्रीय पंतप्रधान केअर फंडातून देशभरात ५५१ प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता

पंतप्रधान केअर फंडातून देशभरात ५५१ प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता

74

नवी दिल्ली : देशभरातील रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनची उपलब्धता वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान केअर निधीतून [ pm care fund ] ५५१ पीएसए वैद्यकीय आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायला निधी पुरवण्यासाठी सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे.

राज्य आणि केंद्र्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जातील. महाराष्ट्र राज्यात, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर यासह एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये प्रकल्प असतील. सर्व प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.