Home राष्ट्रीय शास्त्रीय संगीतातील तारा निखळला, पंडित राजन मिश्रा यांचे निधन

शास्त्रीय संगीतातील तारा निखळला, पंडित राजन मिश्रा यांचे निधन

44

नवी दिल्ली : पद्मभूषण पंडित राजन मिश्रा [ pandit rajan mishra ] यांचे कोरोनामुळे रविवारी निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

पंडित राजन मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती़ त्यानंतर हृदयासंबंधी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्यांना 2007 मध्ये भारत सरकारकडून संगीत क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी श्रीलंकासह जर्मनी, फ्रान्स, स्विर्त्झलँड, आॅस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, यूएसएसआर, सिंगापूर, कतार, बांग्लादेश आदी जगभरातील अनेक देशात कार्यक्रम सादर केले आहे. राजन आणि साजन मिश्रा ही गाजलेली जोडी होती. साजन हे कनिष्ठ बंधू होते. दोघांचही जुगलबंदी ऐकण्यास रसिक आतुरलेले असत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी राजन मिश्रा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.