एमबीबीएस परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

उपराजधानी नागपूर

एमबीबीएसच्या पहिल्या, दुसºया आणि तिसºया वर्षांच्या परीक्षा आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रांवर ये-जा किंवा अन्य ठिकाणी जाण्यात अनेक अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलण्याचा पर्याय हाती असल्याने आम्ही हा निर्णय घेतला, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जणांना कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच, १९ एप्रिलला सुरू होणाºया महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती.

 

हे सुद्धा वाचा :

विभागीय वैद्यकीय मंडळाने पदभरती तत्काळ करावी : अमित देशमुख
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *