Home राष्ट्रीय कन्नड अभिनेत्रीने घडवली सख्ख्या भावाची हत्या

कन्नड अभिनेत्रीने घडवली सख्ख्या भावाची हत्या

53

हुबळी (कर्नाटक) : कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला आपल्या सख्ख्या भावाच्या हत्येच्या आरोपात हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनुसार, शनायाने अन्य चार आरोपींच्या मदतीने भाऊ राकेश काटवे याची हत्या करून [ Actress Shanaya Katwe arrested for brother’s murder] त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले होते. राकेशचे कापलेले डोके देवरागुडीहलाच्या जंगलात सापडले, तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रस्त्यावर सापडले. धारवाड जिल्हा पोलिसांनी आणखी चार संशयित आरोपींची ओळख पटवली आहे. यात नियाज अहमद कटिगार ,तौसीफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांचा समावेश आहे. यापैकी नियाजसोबत शनयाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here