सॅनिटायझर वापरण्याच्या या पद्धती आवश्यकच…

उपराजधानी नागपूर

PROPER USE OF SANITIZER : मागील सव्वा वर्षांपासून कोरोनाचे मोठे संकट संपूर्ण जगावर आहे़ यातून कोणताही जीव सुटलेला नाही़ अगदी वन्यप्राण्यांसह पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. एक जीव म्हणून मनुष्यमात्राला इतरांच्या तुलनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच हा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने आतापर्यंत अनेक उपाय योजना सूचवण्यात आल्या आहेत़

यात कोरोनासंबंधी तीन मुख्य नियम पाळणे गरजेचे आहे़ वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर राखणे, मुखाच्छादन अर्थात मास्कचा वापर करणे. (आता तर घरी सुद्धा दुहेरी मास्क वापरण्याची सूचना केली आहे़) याशिवाय सॅनिटायझरचा वापर करणे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना चुकीच्या पद्धती वापरता कामा नये. अनेकदा सॅनिटायझरचा चुकीच्या पद्धतीने वापर होताना दिसून आले आहे. याबाबत आरोग्य संघटनाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.

सॅनिटायझर विकत घेताना त्यावरील माहीती जरूर वाचावी. ज्या सॅनिटायझरमध्ये 60 ते 70 टक्के ईथाईल आणि आईसोप्रोपाईल अल्कोहोल असेल तेच खरेदी करावे. कारण तेच सॅनिटायझर व्हायरसला मारण्यासाठी सक्षम असते. सॅनिटायझरचे 8 ते 10 थेंब दोन्ही हातांच्या तळहातांवर पसरावे व त्यानंतर हातांच्या मागे पुढे आणि नखांवर पसरवून दोन्ही तळहात एकमेकांवर चोळावेत. े सॅनिटायझर लावल्यानंतर ते 2-3 सेकंद नाही तर 10 ते 12 सेकंद सॅनिटायझर हातांवर सुकेपर्यत रगडावे.

हात ओले असतील तर सॅनिटायझर लावून [ use of sanitizer ] काहीच उपयोग होत नाही. सॅनिटायझरचा वापर हा एकदा करून काहीच होत नाही. सॅनिटायझर लावल्यानंतर काही काळातच त्याचा परिणाम संपतो. त्यामुळे पुन्हा व्हायरस हातावर येण्याची शक्यता असते. सॅनिटायझर लावल्यानंतर कोणत्याही वस्तूला स्पर्श करत असाल तर पुन्हा ते लावण्याची गरज असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *