केंद्रीय मंत्र्यांची मुलगी बनली कोरोना योद्धा

राष्ट्रीय

नवी दिल्ली : कोणत्याही पित्याचे आपल्या मुलीशी एक हळवे नाते असते. दोघेही हे नाते जपण्यासाठी धडपडत असतात. तिचे कोणतेही काम पित्यासाठी अभिमानाची बाब ठरत असते. अशातच केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी आपली मुलगी दिशासाठी मोअर पॉवर टू यू माय वॉरियर अशी भावना व्यक्त केली आहे. कारण दिशा (Disha Mandaviya)  सध्या कोरोना योद्धा म्हणून सेवा देत आहे.

मंत्री मनसुख मंडाविया यांनी पीपीई किट घातलेल्या आपल्या मुलीचा फोटो नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. यात ते म्हणतात, की माझी मुलगी, माझा अभिमान. दिशा, तुला या भूमिकेत पाहण्यासाठी मी बराच काळ प्रतीक्षा केली आहे. सध्याच्या कठीण काळात इंटर्न म्हणून तू कर्तव्य निभावत आहेस, हे पाहून अभिमान वाटतो. देशाला सेवेची गरज आहे आणि मला खात्री आहे, की तू स्वत:ला सिद्ध करशील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *