Home राष्ट्रीय नीती आयोगाचे डॉ. पॉल म्हणाले, पाहुण्यांना घरी बोलवू नका

नीती आयोगाचे डॉ. पॉल म्हणाले, पाहुण्यांना घरी बोलवू नका

31

नवी दिल्ली : आता घरात देखील मुखावरण अर्थात मास्क घालण्याची वेळ आहे. आपण घरात आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा मास्क घातला पाहिजे. तसेच, पाहुण्यांना घरी बोलवू नका, असे आवाहन नीती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल [ dr v k paul ] यांनी केले आहे.

देशात कोरोना विषाणूचा आकडा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांसाठी आॅक्सिजन पुरवठ्याची मागणी देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, आॅक्सिजनचा वापर व्यवस्थित करावा. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. घाबरल्याने परिस्थिती अजून बिघडून अधिकच नुकसान होते. भारताकडे मेडिकल आॅक्सिजन आहे, फक्त तो रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यासाठी अडचणी येत आहे.

एखाद्या बाधित व्यक्तीने जर शारीरिक दूरताचे (फिजीकल डिस्टन्सिंग) पालन नाही केले तर त्या व्यक्तीमुळे 30 दिवसात 406 व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला आहे.