Home राजधानी मुंबई नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

31

मुंबई :  राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून, यासाठी लागणारी सर्व रक्कम एका धनादेशाद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे. लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन अँपवर नोंदणी केल्यानंतरतारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM THAKARE ON VACCINATION ] यांनी केले. त्यांनी राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी असली तरी या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोजेस राज्याला मिळाल्याची माहितीही दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाºया सर्व शहीदांना अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसºया लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या थोपवण्यासाठी कडक निर्बंधांची आवश्यकता असल्याचे सांगताना राज्यातील नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून राज्य शासनास सहकार्य करण्याचे आवाहन ही केले. तसेच, संभाव्य तिसºया लाटेचा सामना करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. राज्य शासनानेही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात ६ कोटी नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी दोन डोजेस म्हटले तरी १२ कोटी लसीची आवश्यकता आहे. आपण दररोज १० लाख लोकांचे लसीकरण करू शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे; परंत लस वितरण हे आॅक्सिजन आणि रेमडेसिविरप्रमाणेच केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे थेट लस केंद्रांवर गर्दी करू नये़ ही ठिकाणे कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. राज्याला जसजशी लस उपलब्ध होईल तस तशी सर्व नागरिकांना लस देण्याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.