Home राजधानी मुंबई राज्याला गोरगरिबांच्या रोजीरोटीची काळजी

राज्याला गोरगरिबांच्या रोजीरोटीची काळजी

31
cm of maharashtra

मुंबई : कोरोनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला आहे, अर्थगती मंदावली आहे, निर्बध लावावे लागत आहेत असे असले तरी गोरगरिबांची रोजी रोटी बंद होणार नाही याची काळजी शासनाने घेतली असून जाहीर केलेल्या ५५०० कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची राज्यात तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM U B THAKARE ] यांनी सांगितले.

मोफत शिवभोजन थाळीचा [ SHIVBHOJAN THALI ]  १५ लाखांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर योजनेत आतापर्यंत चार कोटी लोकांनी थाळीचा अस्वाद घेतल्याचे ते म्हणाले.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह इतर ९ सामाजिक सुरक्षा योजनेतील दोन महिन्यांचा १ हजार ४२८ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सात कोटी नागरिकांना एक महिन्यासाठी ३ किलो गहू आणि २ किलो तांदुळ राज्य शासनाच्या वतीने मोफत देण्यास सुरुवात झाली असून, इमारत व बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या १३ लाख कामगारांपैकी ९ लाख १७ हजार कामगारांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचे अनुदान जमा केल्याचे ही ते म्हणाले. 1 लाख 5 हजार घरेलू कामगारांना 15 कोटी 82 लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. यास्तव 50 कोटी रु. चा निधी देण्यात आला आहे़

नगरविकास विभागामार्फत नोंदणीकृत फेरीवाल्यांना मदत करण्यात येत असून त्यासाठी 61.75 कोटी रुपये दिले आहेत तसेच 11 लाख आदिवासी बांधवांना २ हजार रुपयांचे खावटी अनुदान देण्यात येत असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोंदणीकृत रिक्षाचालकांना ही 1500 रु. ची मदत करण्यात येत आहे तर 3 हजार 300 कोटींचा निधी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आरोग्य सुविधा उभ्या करणे, आॅक्सिजन रेमडेसिविरची उपलब्धता असो किंवा अन्य काही, कुठल्याही गोष्टीत सरकार काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. संभाव्य तिसºया लाटेची शक्यता लक्षात घेऊन सुविधांची उभारणी करतांना अर्थचक्र थांबू नये म्हणून राज्यातील उद्योजक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींशी आपण बोललो असून त्यादृष्टीने कामाची आणि कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केल्याचेही ते म्हणाले. येत्या पावसाळ्यात जम्बो कोविड केंद्रांमध्ये पाणी जाणार नाही, अपघात घडणार नाहीत यासाठी स्ट्रक्चरल आणि फायर आॅडिट करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. येणारा काळ लग्नसराईचा असल्याने गर्दी होऊ नये यासाठी 25 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here