Home उपराजधानी नागपूर सुहास्य तुझे मनास मोही, महिलांचे स्मितहास्य दिवसातून कितीवेळा?

सुहास्य तुझे मनास मोही, महिलांचे स्मितहास्य दिवसातून कितीवेळा?

148

नागपूर : Abhivrutta Online News

सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुराही

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायिलेले हे नाट्यपद. कृष्णार्जुन युद्ध या नाटकातील हे शब्द शं.बा.शास्त्री यांनी लिहिले आणि संगीताचा साज वझेबुवा यांनी चढविला आहे.

वरील ओळीतील हास्य हे एका नायिकेला अर्थात महिलेला उद्देशून आहे. हसतो माणूसही; परंतु ते मनमोही असेलच असे नाही. प्रत्यक्षात महिलांचे हसणे हे पुरुषांपेक्षा किती तरी जास्त असल्याचे संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. दिवसभरात पुरुषांपेक्षा महिला जवळपास आठपट जास्त स्मितहास्य करतात, असे येल रिसर्चने म्हटले आहे.

माहितीनुसार, महिलांच्या चेहºयावर दिवसभरात सरासरी 62 वेळा स्मितहास्य असते, तर पुरुषाच्या चेहºयावर मात्र दिवसभरात सरासरी आठवेळा स्मितहास्य दिसून येते, असेही संशोधनात म्हटले आहे. किशोर वय आणि प्रौढ वय या काळातील हास्यांच्या वेळात मोठा बदल होत गेल्याचे दिसून आले आहे.

महिला-पुरुषांच्या स्मितहास्याच्या प्रमाणात फरक असण्याची अनेक कारणे सांगण्यात येतात. महिला मुळातच भावना व्यक्त करणाºया ( EXPRESSIVE ) असतात आणि हे प्रमाणही अधिक असते. त्या निसर्गत:च भावनाप्रधान असल्याने व्यक्तही करतात. ही बाब नाकारणारी महिला क्वचितच दिसून येईल.

स्माईलिंगसाठी [ SMILING ] चेहºयावर आवश्यक असलेले स्नायू त्यांच्यात जन्मत:च चांगले असतात. याशिवाय महिला पुरुषांसारख्या अधिकार गाजवणाºया नसतात. वय, संस्कृती, वंश अशा अनेक बाबींवरही महिलांच्या स्मितहास्याचे प्रमाण अवलंबून असते.

महिलांच्या स्मितहास्याचे प्रमाण जास्त असले तरीही स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आनंदी असतात, असे छातीठोकपणे सांगता येणा नाही. भावनाप्रधान स्वभाव, संस्कृती अशी कारणेही त्यांच्या हास्यामागे असतात. एखादा दु:खाचा प्रसंग असला तरीही महिला रडून मोकळ्या होतात; पण मोकळेपणाने रडणारे पुरुष कमीच असतात. त्यांच्या खूप न हसण्यामागेही हेच कारण सांगितले जाते. जास्त हसल्याने व्यायामही होतो़ ते केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकही फायद्याचेच असते, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.