वाचा गुदगुल्या करणारे भन्नाट जोक्स Tapori Turaki मध्ये….सुनबाई, गरोदर असताना मी जे काही खाल्लं होतं…

टपोरी टुरकी ....Jocks for You

दिवाकर साहेब एकाची मुलाखत घेत आहे…

साहेब : किती वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
कामगार : सर 30 वर्षे.
साहेब : खूप छान. बरं ठीक आहे. तुमचं वय किती?
कामगार : सर 20 वर्षे.
साहेब : अरे पण ! वय 20 आणि कामाचा अनुभव 30 वर्षे कसा काय होवू शकतो?
कामगार : सर…ओव्हरटाईम…

***

किशोर : अरे मदन काय झालं इतकं चिडायला?
मदन : अरे ते फेसबुकवाले मला रोजच नोटिफिकेशन पाठवतात…
किशोर : कसल्या?
मदन : आज यांचा बर्थडे आहे. उद्या त्यांचा बर्थ डे आहे. वैतागला आणला रे नुसता…
किशोर : अरे काही होत नाही.
मदन : जसा काय माझा केकचा धंदाच आहे, असा प्रकार सुरू आहे हा…

***

बात चल रही थी…
अगर बारिश होगी, तो खेल रद्द हो जायेगा.
उसपर एक पती भडक कर बोला, क्यों रद्द हो जाईगा भाई खेल.
अरे, बारिश तो मेरी शादी में भी हुई थी.

***

सासू : सुनबाई, गरोदर असताना मी जे काही खाल्लं होतं, तेच सगळं आज माझ्य मुलाला आवडतं.
सून : ते ठीक आहे हो; पण तुम्ही निदान
सिगारेट, दारू आणि नागपुरी खर्रा टाळायला हवा होता.

***

नम्रता : मी दोन तासांसाठी बाहेर जात आहे.
तुम्हाला काही हवयं का?
संजय : मला तेच हवयं…

***

या पावसाचं गणितच कळत नाही ?
धरणं भरली की याला जोर चढतो,
.
.
.
.
म्हणजे….
पंगतीला खच्चून भाकरी- भात रस्सा वाढायचा.
अन् पोट भरल्याची खात्री पटली की, मटणाची बादली फिरवायची…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *