Home राजधानी मुंबई महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन

6

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत  प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

 विधान भवन येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सकाळी ०८.०० वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापनदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव  ऋतुराज कुडतरकर, श्रीमती मेघना तळेकर,  राजेश तारवी, मा.सभापतींचे सचिव  महेंद्र काज, अवर सचिव  रविंद्र जगदाळे, संचालक, वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, म.वि.स.  निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here