Home राष्ट्रीय बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणूक मतमोजणी रविवारी

बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणूक मतमोजणी रविवारी

43

FIVE STATE VIDHANSABHA VOTING COUNTING : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या रविवारी होत आहे. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांना निवडणूक निकालाची उत्सुकता असली तरी कोरोनासंबंधी निर्बंधामुळे कुठेही विजयी मिरवणूक काढता येणार नाही.

पाच राज्यांबरोबरच लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या 12 मतदारसंघातील पोटनिवडणुकींची मतमोजणीही [ evm vote counting ]  उद्या होणार आहे. यात कर्नाटकातील बेळगाव लोकसभा आणि महाराष्ट्रातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचाही समावेश आहे. सर्व ठिकाणी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. व्होटर हेल्पलाईन या मोबाईला अ‍ॅपवरही निकाल कळू शकतील.

अशांना प्रवेश नाही
मतमोजणी केंद्रांवर कोविड निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीने आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सादर न केल्यास प्रवेश मिळणार नाही.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here