Home राष्ट्रीय गुजरातमधील कोरोना उपचार केंद्राला भीषण आग, १४ रुग्णांचा मृत्यू

गुजरातमधील कोरोना उपचार केंद्राला भीषण आग, १४ रुग्णांचा मृत्यू

26

गांधीनगर : गुजरातमधील भरूच येथील पटेल वेलफेअर रुग्णालयातील कोविड उपचार केंद्राला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, पटेल वेलफेअर रुग्णालयात कोविड सेंटर देखील बनवण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या आग लागण्याची घटना घडली़ यावेळी रुग्णालयात कोरोना रुग्ण देखील होते. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने अन्य एका रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here