Home राजपाट चार राज्य, एका केंद्र्रशासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल जाहीर

चार राज्य, एका केंद्र्रशासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल जाहीर

21

BYE POLL RESULTS 2021 : चार राज्ये आणि एका केंद्र्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत द्रमुक, केरळात डावी लोकशाही आघाडी, पुदुच्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, तर आसाममधे भाजपाने मोठी बाजी मारली आहे.

आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सत्ताधारी पक्षांनी सत्ता कायम टिकवली आहे. तर तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत आहे.

विविध राज्यांमधे पक्षनिहाय विजयी किंवा आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या अशी आहे़ (यात बदल शक्य आहे.) पश्चिम बंगाल- एकूण जागा २९२. तृणमूल काँग्रेस २१४, भाजपा ७८. तामिळनाडू – एकूण जागा २३४. द्र्रमुक १४४, अण्णा द्र्रमुक ८९, तर अन्य १. आसाम – एकूण जागा १२६. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७८, महाजाथ ४६ आणि अन्य २.

केरळ – एकूण जागा १४०. डावी लोकशाही आघाडी ९८, संयुक्त डावी आघाडी ४२. पुदुच्चेरी – एकूण जागा ३०. राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४. धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी पुरोगामी आघाडी ६, तर अन्य ३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here