Home राज-पाट ममतादीदींना सहा महिन्यांत पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. कारण…

ममतादीदींना सहा महिन्यांत पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. कारण…

100

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं [ mamata banerjee ] नंदीग्राम मतदारसंघातून हरल्या असल्या तरी त्यांना पुन्हा अर्थात तिसºयांदा मुख्यमंत्री होता येणार आहे. मात्र, सहा महिन्यांच्या काळात पुन्हा विधानसभेसाठी निवडणूक लढवावी लागेल़ कारण या राज्यात विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह अर्थात विधानपरिषद नाही.

पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे. ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री होता येईल, पण पुढच्या सहा महिन्यात त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी टीएमसीच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण बंगालमध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे विधान परिषदेतून ममतादीदींना आमदार होता येणार नाही.

ही बातमी सुद्धा वाचा :

चार राज्य, एका केंद्र्रशासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल जाहीर