Home राज पाट ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव

ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव

40

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पार्टीला चांगलीच धूळ चारली आहे. मात्र, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभूत व्हावे लागले आहे.

रविवारी सुरुवातीला भाजप उमेदवार सुवेंद्रू अधिकारी आणि ममतादीदी यांच्यात काट्याची टक्कर सुरू होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अधिकारी हेच आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी अचानक ममतादीदींनी आघाडी घेतली आणि त्यांना 1200 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते; परंतु काही वेळानंतर अधिकारी यांना विजयी घोषित करण्यात आले. परिणामी ममतादीदींच्या समर्थकांना मोठा धक्का बसल्याचे चित्र राज्यात दिसून आले. काहींनी पुन्हा मतमोजणी मागणी केली असल्याचे वृत्त आहे; परंतु त्याला दुजोरा मिळू शकला नाही.

हे सुद्धा वाचा :

ममतादीदींना सहा महिन्यांत पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. कारण…

चार राज्य, एका केंद्र्रशासित प्रदेशातील निवडणुकीचे निकाल जाहीर