शेळ्या आणि गायींची मालकीण बनली चक्क आमदाऱ़क़से ते पाहा

उपराजधानी नागपूर

: राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात असलेला दुपारी दुसºया पक्षात उडी घेतो, सायंकाळच्या सुमारास तोच तिसºया पक्षात कोलांटउडी घेतो, असे चित्र अनेकदा अनुभवास आले आहे़ एका रात्रीतून राजकारण बदलून जाते़ आपल्या देशात अगदी पहाटेच्या सुमारासही एका राज्यात शपथविधी आटोपला होता. त्यामुळे राजकारणात मिनिटांपूर्वीचा मित्र हा शत्रू होऊन जातो, तर मित्र हा पाठीवर अविश्वासाचा फटका मारतो. (अर्थात पाठिंबा काढून घेतो़ वगैरे…)

पश्चिम बंगालमध्ये यापेक्षा वेगळी गोष्ट घडली आहे. काल परवाच्या रविवारी विधानसभा निवडणुकीचा (२०२१) निकाल घोषित झाल्यानंतर चक्क शेळ्या आणि गायींची मालकीण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर आमदार बनली आहे. चंदना बाऊरी [ CHANDANA BAURI BJP ] असे त्यांचे नाव असून, त्या केवळ ३० वर्षांच्या आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संदीप मंडल यांचा सुमारे चार हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. या विजयानंतर चंदना यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

चंदना या अत्यंत सामान्य कुटुंबातील असून, घोषित संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे केवळ एका झोपडीसह काही पैसे, तीन शेळ्या आणि तीन गायी आहेत. चंदना यांना तीन मुले आहेत.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार, चंदना यांच्याकडे केवळ ३१ हजार ९८५ रुपयांची संपत्ती आहे. तसेच, पतीकडे ३० हजार ३११ रुपयांची संपत्ती आहे. त्याचे पती राज मिस्त्री म्हणून काम करतात. चंदना यांच्या घरात शौचालयदेखील नाही.

लवकरच त्या पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदार म्हणून दिसतील, यात शंका नाही. एक सर्वसामान्य महिला आपल्या सर्वसामान्य लोकप्रियतेवर लोकशाही मार्गाने जनतेकडून निवडून आले, हेच मोठे यश आहे.

अभिवृत्त न्यूज पोर्टल [ ABHIVRUTTA NEWS PORTAL ] अंतर्गत महिलाविषयक पर्वती विभागाकडून विशेष शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *