Home उपराजधानी नागपूर माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण रुग्णालयात दाखल

माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण रुग्णालयात दाखल

19

नागपूर : माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना कोरोनामुळे बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे वडील आहे. तिची आई आणि बहीणही कोरोनाग्रस्त असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे.

प्रकाश पदुकोण [ prakash padukone coronavirus ] यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. बंगळुरूमधील महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. प्रकाश पदुकोण यांची पत्नी उज्ज्वला आणि दुसरी मुलगी अनीषा या दोघींनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्या घरी उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here