Home राष्ट्रीय मेट्रो गाडी पुलावरून धावत होती आणि अचानक….

मेट्रो गाडी पुलावरून धावत होती आणि अचानक….

138

मेक्सिको सिटी : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये एका एलिवेटेड मेट्रो मार्ग कोसळल्याने [ BRIDGE COLLAPSE WHILE METRO RUNNING ] कमीत कमी 23 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

मेक्सिको सिटीच्या [ MEXICO CITY ] महापौर क्लाऊडिया शिवबाऊन यांनी सांगितले, की मेट्रो गाडी एलिवेटेड लाईनवरून जात असताना पुल खाली रस्त्यावर कोसळला. या अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 70 जण जखमी झाल्याची शक्यता आहे. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा डबा पुलाच्या खाली कोसळताना दिसत आहे. सरकारने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सरकारी अधिकाºयांनी दिली.
दरम्यान, मागील मार्च 2020 मध्ये याच मार्गावर दोन गाड्यांची टक्कर झाली होती़ यात एकाचा मृत्यू आणि 41 लोक जखमी झाले होते. (छायाचित्र : इंटरनेट)