Home साहित्य-संस्कृती काव्यभिलाषा काव्याभिलाषा … महामारी

काव्याभिलाषा … महामारी

31

काव्यरचना

नूतन झाडे नागपूर

स्मशानात प्रेतांवर प्रेताचे चरत
रचले आहे
उभे राहून स्वर्गदारात
अखेरचा निरोप घेत आहे

मृत्यूंच्या तांडवात सरणाचे
लाकूडही माघारले
विक्राळ ज्वाला कवेत घेती
आसवे जागीच थिजली आहे

ज्यांनी कुणी गमावलं आपलं
त्यांच्या लेखी महामारी आहे
ज्यांच्या दारी आजार नाही
त्यांना राजकीय घोटाळा भासत आहे

महामारी आहे त्यांच्यासाठी
ज्यांची उदर रिकामी झाली
कुंकू मिटलं, नाती सुटली
अन् तुटली राखीही

जीव जीवात यावा
लोटांगण डॉक्टरसमोर आहे
याचक आज मंदिरात नव्हे,
रुग्णालयात रांगत आहे

डोळे भरून पहिले तांडव मृत्यूचे
जमीन पायाखाली हादरली आहे
जीवनाची भीक कुणापुढं मागू
कंठ सुकला आहे
जीवनाची भीक कुणा मागू
कंठ सुकला आहे…

 

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here