फोटो’ज गॅलरी …… सर्वसाधारणपणे एखादा लोकप्रिय चित्रपट वा नाटकांच्या तिकिटा पूर्ण संपल्यानंतर हाऊस फुल असा फलक लावला जातो;

STAND ALONE PHOTO

सर्वसाधारणपणे एखादा लोकप्रिय चित्रपट वा नाटकांच्या तिकिटा पूर्ण संपल्यानंतर हाऊस फुल असा फलक लावला जातो;परंतु दुर्दैव असे की चक्क स्मशानभूमीबाहेर असा प्रकार दिसू लागला आहे. कोरोना महामारीच्या दुसºया लाटेत अनेकांचा मृत्यू होत असल्याने कधी नव्हे अशी वेळ मानवांवर आली आहे.

कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू महानगरातील चामराजपेट () येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे स्मशानभूमीबाहेर हाऊस फुल असा फलक लावल्याचे दिसून येत आहे. या स्मशानभूमीत 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारासाठी जागाच नसल्याने आणखी मृतदेह घेतले जाणार नाही, अशी सूचना करण्यात येत आहे. लोकमत 18 ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

बंगळुरू शहरात 13 स्मशानभूमी असून, कोरोनामुळे सर्व ठिकाणी अशीच काही स्थिती आहे. अनेक कुटुंबियांना आपल्या नातेवाईकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बराच वेळ रांगेत वाट पाहावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *