Home राजधानी मुंबई अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागाकडे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागाकडे

39

CABINATE DECISION : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या महामंडळाची ध्येय व उद्दिष्टे विचारात घेऊन हा विषय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून वगळून, हा विषय नियोजन विभागाकडे सोपविण्याबाबतच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली.

अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील प्राध्यापकांना 7 वा वेतन आयोग

राज्यातील शासन अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील 622 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक यांना 7 व्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करण्यास आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 116 कोटी 77 लाख 11 हजार इतका खर्च तसेच 1 जानेवारी 2016 पासून वेतन थकबाकी देखील देण्यास आज मान्यता देण्यात आली.