Home उपराजधानी नागपूर आनंदी जीवन फाऊंडेशन, सेवाश्रय ग्रामीण विकास संस्थातर्फे कौटुंबिक समुपदेशन

आनंदी जीवन फाऊंडेशन, सेवाश्रय ग्रामीण विकास संस्थातर्फे कौटुंबिक समुपदेशन

111

नागपूर : सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात मानसिक आधार प्रदान करण्याच्या उद्देशाने आनंदी जीवन फाऊंडेशन आणि सेवाश्रय ग्रामीण बहुद्देशीय विकास संस्थाच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक समुपदेशन करण्यात येत आहे.

मागील एक ते सव्वा वर्षांपासून देशावर कोरोना संसर्गाचे भीषण संकट आहे. या टाळेबंदीच्या ( CORONA LOCKDOWN ) काळात संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना घरीच राहावे लागत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असून, दुकाने वा प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागत आहे. अनेकांची कामे घरातूनच [ WORK FROM HOME ] सुरू आहेत. अनेकांनी आपली नोकरी, रोजगार गमावल्याने सर्वांमध्ये एक प्रकारची भीती, नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे लहान मोठ्या कारणांवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणावाची स्थिती पाहावयास मिळत आहे. हीच बाब लक्षात घेत अशा कुटुंबांना मानसिक आधार देत त्यांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक येथील आनंदी जीवन फाऊंडेशन आणि सेवाश्रय ग्रामीण बहुद्देशीय विकास संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅड. समीर शिंदे यांचे मार्फत कौटुंबिक समुपदेशन [ FAMILY COUNCILING ]  करण्यात येत आहे.
मागील कोरोना काळापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 800 पेक्षा अधिक कुटुंबांतील सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले असून, त्यांना भीतीग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण यश मिळत आहे. हे संपूर्ण समुपदेशन यापुढेही कोरोना काळात मोफत असेल. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 7304936777 यावर संपर्क साधावा. या कठीण अशा सर्वांनीच संयमाने धीर धरून कुटुंबात ताणतणावमुक्त राहावे, असे आवाहन अ‍ॅड. समीर शिंदे यांनी केले आहे.