Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र मंत्री यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा, राज्यात जिल्हास्थळी महिला व बालविकास भवन...

मंत्री यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा, राज्यात जिल्हास्थळी महिला व बालविकास भवन उभारणार…

32

नाशिक : महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून महिला व बाल विकास भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर [ YASHOMATI THAKOOR ] यांनी केले आहे.

महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच या भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ‘स्मॉल मार्ट’ [ SMALL SMART ] ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी, असे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महिला व बालकांविषयीच्या समित्याविषयी अधिक जागृकपणे काम करणे आवश्यक असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समिती विषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच कोंटुबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, महिला आयोगाच्या कार्यालयाचे कामकाज, बालगृह वन स्टॉप सेंटर [ ONE STOP CENTER ] वर लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना ॲड. ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.