काव्याभिलाषा ………. जन्मलो तिज पोटी

काव्याभिलाषा

संजय मुंदलकर

वाढलो एका गर्भात नऊ महिने नऊ दिस…
श्वास श्वास दिला अन् भरवला घास
आकारलो मी, म्हणून आज उभा पायावरी़.
मडक्यात, इथं तिथं पै पै जमा तिची,
लुगड्याला दांड करून
मेंगीच्या कापसातून दोन पैसे कमावत
पांढरा सदरा खाकी पँट
अंगावरी चढवताना पाह्यलं मी,
अन्
दिलीत माझ्या दप्तरात
नवीकोरी पाटी पुस्तक, लेखणी…
होती भागीदारी बाबांनी कमावलेल्या
पिठात ‘मिठा’ची तिची!
तापानं फणफणलो तेव्हा राती डोळ्यात जागल्या,
ध्यास तिचा होता चार पुस्तकं शिकावं,
म्हणून रान-मान तुडवत राबली
जाहलो धन्य मी जन्मलो तिज पोटी…

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *