Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा काव्याभिलाषा ………….परमेश्वराने कलाकारीने मूर्ती जी घडवली आई

काव्याभिलाषा ………….परमेश्वराने कलाकारीने मूर्ती जी घडवली आई

113

नूतन झाडे, नागपूर

 

आई तुझ्या मायेचा अंत लागत नाही …
तुझ्याविना सुखात मायेचा सागरही नाही …

परमेश्वराने कलाकारीने मूर्ती जी घडवली आई
काळजी घेण्या प्रत्येका घडवली आपलीच प्रतिकृती …

परमेश्वराच्या प्रत्येक पुत्राला देव जवळ असावा
म्हणून केली असावी रचना आईची
मुलाला ती परमेश्वराइतकचं नाही पडू देत कमी…

म्हणूनच कवी यशवंत म्हणतात,
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

तो कमनशिबी ज्याने गमावली आई
अन्
ज्यानं ठोकरलं दिव्य नातं तो दुर्दैवी
आईची माया आटल्यानं आटत नाही

कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलयं…
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला हे सूर्य चंद्र तारे

*****