Home BREAKING NEWS टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा : डॉ. नितीन राऊत

टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा : डॉ. नितीन राऊत

15

नागपूर   कोरोना बाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनसोबतच टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी राज्य शासनाकडे केली. आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यावेळी उपस्थित होते.

एका खासगी कंपनीने ऑक्सिजन प्लाँट उभारण्याबाबत सादरीकरण केले. यावेळी  जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या होत असला तरी अधिकच्या तरतूदीसाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, असेही त्यांनी आदेश दिले.

संपूर्ण राज्यासाठी 800 टॉसिलीझुमॅब इंजेक्शन केंद्राकडून येतात. बाधितांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. गेल्या 5 मे रोजी 105 व त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी टॉसिलीझुमॅब इंजेक्शन ‍जिल्ह्याला प्राप्त झाले होते. या इंजेक्शनसाठी वाढीव मागणी सीपला कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे.

आज जिल्ह्यात 170 मेट्रीक टन ऑक्सिजन [ oxygen ] आणण्यात आला. यापैकी ऑक्सिजन सप्लायर कंपन्यांना 62 मेट्रीक टन तर रुग्णालयांना 72 मेट्रीक टन वितरीत करण्यात आला.

जगदंबा – 10, भरतीया – 10, आदित्य (हिंगणा) – 15, आदित्य (बुटीबोरी) – 15, विदर्भ – 6 आणि रुकमणी (हिंगणा) – 6 असे एकूण 62 मेट्रीक टन वितरण करण्यात आले.  तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – 26, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय – 20, शालिनीताई मेघे – 5, लता मंगेशकर – 6, अलेक्सीस – 4, आशा हॉस्पिटल (कामठी) – 2, अवंती – 4, क्रीम्स – 1, ऑरेंज सिटी – 1, सुवरटेक – 2 आणि व्होकार्ट – 1 असे एकूण 72 मेट्रीक टन वितरण करण्यात आले. आज जिल्ह्यात 3322 रेमडेसिवीर इंजेक्शन [ remdesivir injection ] प्राप्त झाले. शासकीय वितरण आदेशानुसार त्यांचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here