Home उपराजधानी नागपूर दीक्षाभूमीत ३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू

दीक्षाभूमीत ३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू

22

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांना बेड, आॅक्सिजन मिळावा आणि त्यांचा जीव वाचवावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पुढाकार घेतला असून दीक्षाभूमी [ deeksha bhoomi ] याठिकाणी ३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी रविवारी उद्घाटन् केले. याठिकाणी १५ आॅक्सिजन बेड आणि १५ विलगीकरण बेड उपलब्ध आहेत. शिवाय आॅक्सिजनचे १० जम्बो सिलेंडर ठेवले असून आॅक्सिजन सेंट्रलाईज सिस्टीमने थेट रुग्णांना बेडवर दिला जाणार आहे.

शहरातले नामवंत डॉ. सुशांत मेश्राम यांचा मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाºयांचे पथक नि:शुल्क सेवा देणार आहे. हे कोविड केअर सेंटर [Covid Care Center] सेवाकार्य म्हणून सुरू केले असून कोविड रुग्णांसाठी ते नि:शुल्क राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here