Home उपराजधानी नागपूर कोरोना काळात मन सांभाळा, आपले आणि इतरांचेही

कोरोना काळात मन सांभाळा, आपले आणि इतरांचेही

87

शिल्पा वकलकर, नागपूर

कोरानाची दुसरी लाट जगातील बहुतांश देशात पसरलेली आहे. काही देशांमध्ये दुसरी तर, काही देशांमध्ये तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाच्या चार किंवा पाच लाट येतील, असे जागतिकस्तरावरील आरोग्य यंत्रणा सांगत आहेत. अशा परिस्थितीत स्वत:सह इतरांचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळावे लागणार आहे़ आता वेळ अशी वेळ ठेपली आहे की केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घेण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. लहान मुले, तरुण, मध्यम वयीन, वृद्धाच्या नव्या समस्या झपाट्याने पुढे येत आहे़ कारण या कोरोनाच्या संकटात प्रत्येक वयोगटाच्या समस्या वेगवेगळ्या पातळीवरील आहे. कोरोनामुळे दररोज जी सामाजिक समस्या पुढे आली आहे, त्याचा उपाय केवळ आपल्याच हाती तो कोणत्याही तज्ज्ञाकडे मिळणार नाही, हेही तितकेच खरे!

कोरोना महामारीचा हा काळ तरुणांपेक्षा वयोवृद्धांसाठी अधिक धोकादायक ठरला आहे. तरुणांपेक्षा वयोवृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते. सरत्या वयानुसार मधुमेह, दमा, रक्तदाब यासारखे आजार असतील तर शरीर अधिक कमजोर झालेले असते. त्यामुळे ते आपल्या काळजीसाठी इतरांवर अवलंबून असतात. वयोवृद्धांमध्ये वाढत्या वयानुसार कोरोना संक्रमणाचा धोका जास्त वाढलेला दिसून येतो़ याशिवाय उर्वरित आयुष्याबद्दल काळजी आणि भीतीची जाणीव वाढायला लागते़ अशा स्थितीत त्यांना मानसिकरित्या आधार देणे गरजेचे आहे.

धक्कादायक म्हणजे केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणवर्गामध्ये सुद्धा नैराश्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या लाटेत अनेकांनी आपल्या नोकºया किंवा रोजगार गमावले आहे़ शिवाय व्यवसायही बंद पडले़ यात रस्तोरस्ती गाड्या चालवणारे, फेरीवाले, चहाटपरीवाले, भाजीपाला विके्रते याशिवाय अन्य व्यवसायातील मंडळी नैराश्यात आल्याचे चित्र आहे़ कारण यात तरुणांना अधिक भरणा आहे़ त्यामुळे त्यांना मानसिकरित्या आधार देणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीची कल्पना देत कोरोना काळात मानसिक आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे उपाय अंगीकारावे.

काही उपाय
मागील वर्षभरापासून देशच काय जगभरातील मुद्रित (PRINT MEDIA), ईलेक्ट्रॉनिक ( ELECTONIC MEDIA), वेब मीडिया (WEB MEDIA ) केवळ कोरोना संसर्गासंबंधी बातम्याचाच भरणा असल्याचे दिसून येते. मात्र, अशा प्रकारच्या बातम्या पाहून, ऐकून मनावर दडपण येतो. त्यामुळे शक्य तितक्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी बोलणे, ऐकणे आवश्यक आहे. आपले आईवडील,भाऊ-बहीण यांच्याशिवाय आजी आजोबा वा लांब राहणाºया नातेवाईकांशी, मित्रांशी फोनवरून गप्पा माराव्यात, चर्चा करावी. यातून आपल्यासह इतरांनाही आधार मिळत असतो. संगीत ऐका, वाचन करा, घरात खेळण्याजोगे खेळ खेळा आणि त्यात बालकांना सहभागी करा. कारण यातून आपले तन आणि मन ताजेतवाणे होईल…अगदी कायमचे.

सेवाश्रय ग्रामीण विकास संस्था, आनंदी जीवन फाऊंडेशनतर्फे
कौटुंबिक समुपदेशन

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात मानसिक आधार प्रदान करण्याच्या उद्देशाने सेवाश्रय ग्रामीण बहुद्देशीय विकास संस्था, नागपूर आणि आनंदी जीवन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक समुपदेशन करण्यात येत आहे.
मागील एक ते सव्वा वर्षांपासून देशावर कोरोना संसर्गाचे भीषण संकट आहे. या टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) काळात संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना घरीच राहावे लागत आहे. शाळा-महाविद्यालये बंद असून, दुकाने वा प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागत आहे. अनेकांची कामे घरातूनच सुरू आहेत. अनेकांनी आपली नोकरी, रोजगार गमावल्याने सर्वांमध्ये एक प्रकारची भीती, नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे लहान मोठ्या कारणांवरून कुटुंबातील सदस्यांमध्ये ताणतणावाची स्थिती पाहावयास मिळत आहे. हीच बाब लक्षात घेत अशा कुटुंबांना मानसिक आधार देत त्यांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक येथील आनंदी जीवन फाऊंडेशन आणि सेवाश्रय ग्रामीण विकास संस्था,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅड. समीर शिंदे यांचे मार्फत कौटुंबिक समुपदेशक करण्यात येत आहे.
मागील कोरोना काळापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 800 पेक्षा अधिक कुटुंबांतील सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले असून, त्यांना भीतीग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यात महत्त्वपूर्ण यश मिळत आहे. हे संपूर्ण समुपदेशन यापुढेही कोरोना काळात मोफत असेल. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक 7304936777 यावर संपर्क साधावा. या कठीण अशा सर्वांनीच संयमाने धीर धरून कुटुंबात ताणतणावमुक्त राहावे, असे आवाहन माध्यम प्रमुख शिल्पा वकलकर आणि अ‍ॅड. समीर शिंदे यांनी केले आहे.

(महाराष्ट्रभर समुपदेशनासाठी संपर्क : 7304936777)