अफगाणिस्तानानंतर आता रशियातही चिमुकले दहशतवादाचे लक्ष्य

राष्ट्रीय

Abhivrutta News Bureau 

मॉस्को : दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात शाळेबाहेर घडवून आणलेल्या स्फोटानंतर आता रशियातील कझान शहरात मंगळवारी एका शाळेत घुसून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत किमान 13 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये 8 चिमुकल्यांसह एका शिक्षकाचा समावेश आहे. घटनेनंतर तिसºया मजल्यावर असलेल्या खिडकीतून दोन चिमुकल्यांनी उडी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शाळा क्रमांक १७५ मध्ये दोन युवकांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. काही माध्यमांनी एकाच व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी म्हटले, की १९ वर्षीय बंदुकधारी युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली बंदूक त्याच्याच नावे नोंदणी केली होती. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर पोलिसांनी एका 17 वर्षांच्या संशयिताला सुद्धा ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही.

दरम्यान, अमेरिकेप्रमाणे रशियामधील शाळांमध्ये गोळीबार होण्याची घटना खूपच कमी आहे. यापूर्वी सन 2018 मध्ये क्राईमन्समध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती़ यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने 19 लोकांना गोळ्या घालून ठार केले होते. रशियाच्या मुस्लिमबहुल तारार प्रदेशाची राजधानी काझान शहर आहे. हे राजधानी मॉस्कोपासून 725 कि.मी. अंतरावर आहे.

अफगाणिस्तानात नृशंस हत्या
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शुक्रवारी (7 मे) मुलींच्या शाळेबाहेर सलग तीन बॉम्बस्फोट [ kabul school blast ] घडवून आणले. यात आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्या 165 पेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे मृतकांत 12 ते 20 वर्षे वयोगटातील मुलींचा समावेश आहे. अर्थातच हल्लेखोरांचा विरोध मुलींच्या शिक्षणाला दिसून येतो.

दुसरीकडे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानी बंडखोरांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. मात्र, या संघटनेने हिंसाचाराच्या भूमिकेचा निषेध करत अफगाण नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे दहशतवाद्यांचा हेतू पूर्णपणे स्पष्ट झाला आहे की त्यांना आता कट्टरपंथियांचे कायदे राबवायचे आहेत. हा हल्ला शिया मुस्लिमांच्या परिसरात झाला, तर या दुर्घटनेत बळी पडलेले शिया हजारा समाजातीलच आहेत. दुसरीकडे अफगाण सरकार आणि अमेरिका या दोघांबद्दल जनतेत रोष दिसून आल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सांगतात. कारण लवकरच अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडणार आहे.

अमेरिकानेही हल्ल्याचे अमानुषता असे वर्णन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांच्यानुसार, अमेरिका अफगाणिस्तानच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. भारतानेही निषेध व्यक्त करत अतिरेक्यांचे आश्रयस्थान नष्ट करण्याची आणि देशभरात युद्धबंदी लागू करण्याची गरज व्यक्त केली.

(छायाचित्रे संकेतस्थळावरून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *