Home राष्ट्रीय कोरोना प्रतिबंधक कोविशिल्डची दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी वाढला

कोरोना प्रतिबंधक कोविशिल्डची दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी वाढला

50

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड (Covishield) या लसीची दुसरी मात्रा घेण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून आता १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा किती कालांतराने घ्यावी, याबाबत उपलब्ध प्रत्यक्ष प्रमाणांच्या आधारे कोरोना कार्यगटाने  (NEGVAC) दोन मात्रांमधील अंतर १२ ते १६ आठवडे ठेवण्याची शिफारस केली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने एका बैठकीत ही शिफारस स्वीकारली.

हे सुद्धा वाचा :

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here