Home उपराजधानी नागपूर नागपूर शहरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेवा सुरू

नागपूर शहरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेवा सुरू

21

नागपूर : मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार  नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला [ drive in vaccination ] सुरुवात केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

बेडची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा करणारा नागपूर जिल्हा या उपक्रमातही अग्रेसर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहीम सुरू केल्याबद्दल डॉ.नितीन राऊत यांनी मनपाचे कौतुक केले.

आज नागपूर शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील ज्येष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष ), कृष्णा छाबराणी (६२ वर्ष) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. छाबराणी परिवाराशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार अभिजित वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त  राधाकृष्णन बी, स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली विभागाच्या सभापती वंदना भगत, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त किरण बगडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते.

आज सकाळी ग्लोकल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ‘चे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवसभरात हा अशा पद्धतीच्या लसीकरणाचा दुसरा कार्यक्रम आहे.

नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते. या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे जेष्ठ नागरिक स्वतःचे वाहन, दुचाकी चालवू शकतात, त्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे, तथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here