Home राजधानी मुंबई बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण

बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण

15

मुंबई : संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या पात्र २२ उमेदवारांना बार्टी संस्थेमार्फत व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी,पुणे) देण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणाचे 10 मे 2021 रोजी उद्घाटन झाले आहे, अशी माहिती महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र 22 उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी करिता आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ दिला आहे. राज्यातील अधिकाधिक उमेदवारांची केंद्रीय सनदी अधिकारी पदांवर निवड व्हावी या उद्देशाने उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजनेसोबतच मुलाखतीचे पूर्वतयारी प्रशिक्षण देण्याची योजना बार्टी संस्थेने आखली आहे. त्यानुसार कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने आखून दिलेल्या निर्देशांचे पालन करत 10 मे 2021 पासून हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण  13 जून 2021 पर्यंत सुरू राहील.

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून या पूर्वतयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकारी या उमेदवारांना मार्गदर्शन करणार असून उमेदवारांच्या दोन अभिरुप मुलाखती (mock interview) घेण्यात येतील, असेही श्री. गजभिये यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here