Home राजधानी मुंबई यंदाच्या पावसाबद्दल ‘ही’ बातमी वाचली का…

यंदाच्या पावसाबद्दल ‘ही’ बातमी वाचली का…

96

मुंबई : भारतीय समुद्र क्षेत्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून (MONSOON) यंदा मे महिन्याच्या 31 तारखेला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या किनारपट्टी भागात असलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे मान्सून लवकर येणार असल्याची माहिती आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो. मात्र, यंदा तो जवळपास आठवडाभर आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे सकारात्मक परिणाम झाला असून, मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्याने मान्सून लवकर दाखल होणार आहे.

दरवर्षी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांत राज्यात तो दाखल होत असतो. यंदाही याच कालावधीत तळकोकणात (BASE KONKAN) धडक देईल. त्यानंतर 4-5 दिवसांत राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

ही बातमी सुद्धा वाचा :

बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण