Home सिनेरंग सिनेरंग …. सुंदर आणि आकर्षक कृती सेनॉन

सिनेरंग …. सुंदर आणि आकर्षक कृती सेनॉन

64

कृती सेनॉन हिने सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ साली एका तेलुगु चित्रपटात अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आणि याच काळात हिरोपंतीमध्ये टायगर श्रॉफ सोबत नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले. या भूमिकेसाठी तर तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला. दुसºयाच वर्षी (२०१५) दिलवालेमध्ये तिची भूमिका होती. राब्ता चित्रपटात सुशांतसिंह राजपूत-कृतीची भूमिका होती.

 


कृतीचा जन्म नवी दिल्ली येथे चार्टर्ड अकाउंटंट राहुल सनॉन आणि प्राध्यापिका गीता सनॉन यांच्या पंजाबी कुटुंबात झाला. तिच्या लहान बहिणीचे नाव नुपूर असे आहे. कृतीने दिल्ली पब्लिक स्कूल येथे शिक्षण घेतले आणि नंतर नोएडाच्या जयपी इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी पदवी मिळविली.

 

कृतीने क्लोजअप, विवेल, अमूल, सॅमसंग, हिमालया यासारख्या ब्रान्ड्सच्या जाहिरातीसाठी काम केले आहे. विल्स लाईफस्टाईल फॅशन वीक, चेन्नई इंटरनेशनल फॅशन वीक, इंडिया ज्वेलरी वीकमध्ये सुद्धा दिसून आली. रितू बेरी, सुनीत वर्मा, निकी महाजन यासोबतही मॉडलिंग केली आहे.

 


कृतीचा नेनोक्कडीने हा पहिला तेलुगु चित्रपट होता. हीरोपंती हा पदार्पणातील हिंदी चित्रपट होय. यानंतर दोहचय, दिलवाले, राब्ता, बरेली की बर्फी, लुका छुपी, अर्जुन पटियाला, हाउसफुल 4 यासह सन 2022 मध्ये भेड़िया हा चित्रपट येत आहे.


२७ जुलै ही कृतीची जन्मतारीख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here