Home अनुपमा... महिला विश्व महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे संवेदनशीलरित्या हाताळा

महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे संवेदनशीलरित्या हाताळा

69

मुंबई : महिलांवरील घरगुती हिंसाचाराची प्रकरणे काळजीपूर्वक आणि संवेदनशीलरित्या हाताळावीत. त्यासाठी अशा महिलांना समुपदेशन उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच, त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन करून त्यांना हिंसाचार करण्यापासून परावृत्त करावे. आवश्यक असेल तेथे महिलांना कायदेशीर मदत मिळवून द्यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर [ AD. YASHOMATI THAKOOR ] यांनी आज दिल्या.

राज्यातील सर्व महसुली विभागांची विभागनिहाय आढावा बैठक मंत्री ठाकूर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या कोठे कार्यरत नसल्यास त्या तात्काळ कार्यरत कराव्यात. शी बॉक्स () च्या माध्यमातून महिलांना तक्रारींचे माध्यम उपलब्ध असल्याचे समजेल यासाठी आवश्यक ती प्रसिद्धी करावी, असेही मंत्र्यांनी सूचवले.

लसीकरण गतिमान करा : राज्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आदी अंगणवाडी कार्यकर्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. तथापि, उर्वरितांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. बालकांच्या काळजी घेणाºया संस्थांमध्ये (सीसीआय) काम करणाºया सर्व व्यक्तींचे लसीकरण करून घ्यावे. समुपदेशन, बालकांचे पुनर्वसन आदींसाठी आवश्यक तेथे अशासकीय स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिलांचे प्राधान्याने लसीकरण होण्यासाठी देखील प्रयत्न करा, अशा सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा :

कोरोना आपत्तीत अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय