Home उपराजधानी नागपूर नीता सोनवणे यांची ‘क्रांतिकारी आवाज’ संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

नीता सोनवणे यांची ‘क्रांतिकारी आवाज’ संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड

396

नागपूर : नागपुरातील सामाजिक कार्यकर्त्या नीता सोनवणे यांची राज्यस्तरीय क्रांतिकारी आवाज या संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मागील एक ते दीड वर्षापासून उभ्या ठाकलेल्या कोरोना संसर्गामुळे सामाजिक उलथापालथ होऊन सर्वसामान्यांसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत समस्यांच्या निराकरणासाठी ‘क्रांतिकारी आवाज’ या संघटनेची स्थापना केली आहे. यात शाळेची शैक्षणिक शुल्क वसुली, कर्जवसुली, विजबिल, शेतकºयांचे प्रश्न आदी मुद्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ही कार्यकारिणी अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर कार्यरत झाली असून, पहिल्या कार्यकारिणीत संस्थापक व कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे बारामती, रवींद्र टकले (अध्यक्ष बारामती), भक्ती जाधव (उपाध्यक्ष सोलापूर), नीता सोनवणे (उपाध्यक्ष नागपूर),भारत मते (उपाध्यक्ष मुंबई), मयूर सोळसकर (सचिव दौंड), सागर शिंदे (सहकार्यवाहक सोलापूर), स्वप्नील हवालदार (प्रदेश सरचिटणीस शिराळा), वीरभद्र कावडे सदस्य सातारा, हनुमंत वीर सदस्य इंदापूर, शीतल मोठे करमाळा,राज्य संघटक मनोज पवार बारामती,सागर पोमन यांची (सदस्य आणि प्रदेश युवक अध्यक्ष) नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय संघटनेच्या प्रवक्तापदी म्हणून डॉ. गणेश शिंदे पुणे यांची निवड झाली आहे.
दरम्यान, विश्वकर्मा लोहार सुतार विकास परिषद, नागपूर यांच्या वतीने नीता सोनावणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.