Home राजधानी मुंबई पोलिस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय

पोलिस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय

20

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-2018 आणि खात्यांतर्गत उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा [ departmental psi examinition ] 2017 मधील पात्र एकूण 737 उमेदवारांना जून-2021 पासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी [ NASHIK PTC ] येथे मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील 322 उमेदवारांचे प्रशिक्षण सत्र 21 जूनपासून सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, उप निरीक्षक सरळसेवा परीक्षा 2018 मधील एकूण 387 उमेदवार तसेच 2017 च्या प्रतीक्षायादीतील 22 उमेदवार व सत्र क्रमांक 118 मधील मुदतवाढ मिळालेले 6 उमेदवार अशा एकूण 415 उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण 24 जूनपासून सुरू करण्याचे गृह विभागाने प्रस्तावित केले आहे. सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाºया कोरोना मार्गदर्शकतत्त्वांच्या अधिन राहून सुरू करण्यात येतील, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here