राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा २२ मेपासून

उपराजधानी नागपूर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २२ मेपासून घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या तांत्रिक कारणाने रद्द झालेल्या परीक्षांसह टाळेबंदीमुळे स्थगित झालेल्या २१ हिवाळी परीक्षा २२ मे ते ९ जूनदरम्यान घेण्यात येणार आह.

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले होते. यात एकूण प्रथम, तिसºया, पाचव्या व सातव्या सत्राच्या ६२ विषयांचा समावेश होता. आता सदर परीक्षा २२ ते २६ जूनदरम्यान सकाळी ८ ते ५.३० या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यात ४ हजार ४७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *