Home पूर्व विदर्भ म्युकरमायकोसीस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा

म्युकरमायकोसीस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा

62

चंद्रपूर : म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेताना ते बोलत होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना, रेती घाट लिलाव सद्यस्थिती, सातबारा संगणीकरण प्रगती अहवाल, नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी व खरीप हंगाम पूर्वतयारी आधी विशाल बर संबंधित जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आढावा घेतला.

महिला व बाल विकास विभागाचा आढावा घेताना कोविड आजारामुळे अनेक बालकांनी पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षण व त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर पाहणी करावी. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची  माहिती हॉस्पिटलकडून वेळोवेळी मागवून घ्यावी, जे बालक अनाथ आहे आणि नातेवाईकांकडे आहे अशा बालकांची माहिती घेऊन त्यांना मदत व  पुरेपूर लाभ देण्याची कार्यवाही करावी. अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या. तसेच ज्या बालकाला अठरा वर्षे पूर्ण झाले व जॉब लागला नाही त्यांना आधार केंद्रात ठेवून शासकीय संस्थेमार्फत स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.