Home पूर्व विदर्भ पोलिस जवानांनी ‘असे’ घेरले नक्षल्यांना आणि केला सफाया…

पोलिस जवानांनी ‘असे’ घेरले नक्षल्यांना आणि केला सफाया…

152

गडचिरोली : एटापल्ली उपविभागाअंतर्गत येणाºया पोलिस मदतकेंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परिसरात पोलिस व नक्षली यांच्यातील चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यात विभागाला यश आले. आहे. गडचिरोली दौºयावर असलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत पोलिस दलाचे कौतुक केले.

वळसे पाटील म्हणाले,की महाराष्ट्रातील गडचिरोलीजवळील छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी आपले मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करणार आहे.

दरवर्षी प्रमाणे तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नक्षली एकत्र येतात. ही शक्यता लक्षात घेत अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेरन, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली दलातील सी-६० चे जवान आज सकाळी नक्षलविरोधी अभियान राबवित होते. अशातच सकाळी ६.०० ते ७.३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षल्यांनी सी- ६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आव्हान केले असता शरण न येता जोरदार हल्ला चढवला. सी-६० जवानानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. दीड तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळी ६ पुरुष नक्षलवादी, ७ महिला असे एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असल्याचे पोलिस धीक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली.

घटनास्थळी एके ४७, एसएलआर, कारबॉईन, ३०३, १२ बोअर इत्यादी रायफल, भरपूर प्रमाणात स्फोटके मिळून आले. तसेच, नक्षलवाद्यांच्या दैनंदिन जीवनात वापरात येणारे साहित्य मिळाले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे दिलीप वळसे पाटील, गृह मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांनी कौतुक केले. सदर भेटीवेळी संजय सक्सेना (भा.पो.से.) अपर महासंचालक, विशेष अभियान, महाराष्ट्र राज्य मुंबई, गडचिरोली परिक्षेत्राचे उप-महानिरीक्षक संदीप पाटील, अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून त्याचाच हा एक भाग म्हणून आज पहाटे 13 नक्षलवाद्यांचा सी -60 जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा या चकमकीत सामिल असलेल्या सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करतो, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गारे काढले.