Home उपराजधानी नागपूर ज्येष्ठ संगीतकार राम-लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार राम-लक्ष्मण यांचे निधन

13

नागपूर : नागपुरचे सुपुत्र तसेच संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते.
राम कदम उपाख्य राम आणि विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती. राजश्री फिल्मसची निर्मिती असलेला एजंट विनोद हा या जोडीचा पहिला चित्रपट. 1976 मध्ये राम यांच्या मृत्यूनंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. आजपर्यत त्यांनी सुमारे 92 मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते प्रचंड गाजले. अनेक लोकप्रिय गाणी त्यांच्या नावे आहेत.

हिंदी चित्रपट
हम से बढकर कौन, सुन सजना, तराना, आगे की सोच,साँच को आँच नही, लव कुश, तुम्हारे बिना, प्रेमशक्ती, सातवाँ आसमान,बेजुबान, दिवाना तेरे नाम का, पोलिस पब्लिक, हंड्रेड डेज, दिल की बाजी, पत्थर के फुल,मैने प्यार किया, हम आप के है कौन,हम साथ साथ है आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here