कोरोनाची तिसरी लाट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बालरोगतज्ज्ञांना म्हणाले…

राजधानी मुंबई

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर लहान मुलांना त्याचा संसर्ग होऊ नये याकरता करायच्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील बालरोगतज्ज्ञांशी [ Cm Thakare Connected With Corona Task Force ] संवाद साधला. दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीला बालरोगतज्ज्ञ आणि कृती दलातील सदस्य उपस्थित होते.

पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसºया लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचे वय खाली आल्याने संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी अजून योग्य माहिती नाही़ मात्र आपण सावध राहिले पाहिजे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुलांना बरे वाटत नसल्यास पालकांनी त्यांना वेळीच आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवावं म्हणजे उपचार लगेच सुरू करता येतील. घाबरता कामा नये आणि चिंताही करू नका. लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असतो, डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. त्यामुळे डॉक्टरांनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे. योग्य मार्गदर्शन करावे. पालकांनी काय करावे याबाबत आपल्या डॉक्टरांकडून समजून घ्यावे. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची काळजी घ्यावी,, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत पूर्ण यश आलेले नाही. मात्र, रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. सर्व डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचे श्रेय आहे. माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले आहेत. कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

लसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वर्षे वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची राज्यसरकारची तयारी आहे़ मात्र, लसी उपलब्ध नाहीत हीच खरी अडचण आहे. जून महिन्यानंतर लस पुरवठा सुरळीत सुरू होईल. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *