यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे पंतप्रधानांचे आदेश

रानशिवार

नवी दिल्ली : यास [ yaas ] चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यांशी समन्वय साधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिल्या आहेत.

यास चक्रीवादळ येत्या बुधवारी संध्याकाळी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या उत्तरेला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वीज आणि दूरसंचार यंत्रणा प्रभावित झाल्यास त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले. यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकाºयांनी योग्य ते नियोजन आणि समन्वय राखावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

***

आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लसीची मान्यता निराधार : लव अगरवाल

नवी दिल्ली : देशात घेतली गेलेली कोवॅक्सिन [ covaxin ] लस ही आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ग्राह्य धरता येणार नाही असे काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेले वृत्त हे निराधार असल्याचे आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने लसीची मान्यता ठरवली असून जागतिक पातळीवर असा निर्णय झालेला नाही. सध्याच्या काळात प्रवाशांचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात असून लसींच्या प्रकाराचा यात समावेश नाही, असे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त लव अगरवाल यांनी स्पष्ट केले.

***

आतापर्यंत २१ कोटी ८० लाख कोविडप्रतिबंधक लसींचा पुरवठा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडप्रतिबंधक लशीचे एकंदरीत २१ कोटी ८० लाख मात्रा मोफत पुरवले आहेत. त्यापैकी आतापर्यंत १९ कोटी ९० लाखांहून जास्त मात्रा वापरले गेले असून अद्याप १ कोटी ९० लाखांपेक्षा जास्त मात्रा टोचायचे शिल्लक आहेत. येत्या तीन दिवसांत आणखी ४० हजार ६५० मात्रा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना प्राप्त होतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *