Home राजधानी मुंबई १२वी परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य…

१२वी परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य…

52

मुंबई : राज्यातील इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १२ वीची अंतिम परीक्षा, तसेच नीट आणि जेईई मुख्य परीक्षांसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि सचिव उपस्थित होते. यानंतर वर्षा गायकवाड [ school education minister varsha gaikwad on hsc examinition 2021 ] यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. मात्र, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यात यंदा दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे, कोरोनाच्या तिसºया लाटेचा अंदाज घेता याबाबतची सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडणार आहोत. मात्र, पुढील वर्षी मुलांचे नुकसान होऊ नये याकरता आतापासूनच नियोजन केले जाईल. बारावीच्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here