Home उपराजधानी नागपूर दीपस्तंभ संस्थातर्फे अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ

दीपस्तंभ संस्थातर्फे अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ

47

नागपूर : कोरोना संसर्गामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या नागरिकांना दीपस्तंभ धर्मदायी संस्थाच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. लॉकडाऊनच्या स्थिती अनेकांचे रोजगार, नोकरी हातातून गेल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. काही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचे निधन झाल्याने उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली़ अशातच कुटुंबांवर दु:खाचे डोंगर कोसळल्याचे चित्र असताना पीडित परिवारांना दीपस्तंभ धर्मदायी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य व किराणा सामानचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रभाग 37 चे नगरसेवक तसेच नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने, शिक्षण सभापती दिलीप दिवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित गरजू परिवारांना अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. जनतेची सेवा करू या, कोरोनाला हरवण्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

दीपस्तंभ धर्मदायी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सामानात 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 1 किलो तेल, तिखट, हळद, मुरमरा,साबण, लहान मुलांना दूध-बिस्कीट देण्यात येणार आहे.

या कामासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौरागडे, सचिव नंदू मानकर, विनोदकुमार भेले, वर्षा मानकर, धीरज नारनवरे, समिती भालेराव, प्रकाश देशकर, राजेंद्र केवटे, मंगेश ईरपाची, प्रशांत कळसे, नितीन ढंगारे, वागेश वर्मा, शीला कहाते, अर्चना रूसेसरी, ज्योती नाकतोडे आदी सहकार्य करत आहेत.